जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सागर पार्क मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मंगळवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेक महिलांना मैदानाबाहेरच ताटकळावे लागले. त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला.
सकाळी ११ पासूनच जिल्हाभरातून लाडक्या बहिणींना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस दिमतीला ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील महिलांना घेऊन बस सकाळी १० पासूनच सागर पार्क मैदानावर येत होत्या. कार्यक्रमाची वेळ दुपारी अडीचची असताना महिलांना सकाळपासूनच आणण्यात येत होते. मैदानावर तपासणीनंतरच प्रवेश दिला जात होता. दुपारी अडीचपर्यंत मैदान तुडुंब भरले. त्यामुळे त्यानंतर महिलांना मैदानावर प्रवेश रोखण्यात आला. सुमारे दोन ते अडीच हजार महिला मैदानाबाहेर, काही मैदानासमोरील एचडीएफसी बँकेच्या आवारात कार्यक्रम संपेपर्यंत बसल्या होत्या. कारणही तसेच होते. त्यांना ग्रामीण भागातून बसने आणण्यात आले होते. त्यामुळे बस परत निघण्याची वाट पाहत नाइलाजाने त्यांना कार्यक्रम संपेपर्यंत ताटकळावे लागले.
हेही वाचा – रुपालीताई, आधी नगरसेवक म्हणून निवडून या – रोहिणी खडसे यांचा सल्ला
जळगाव : शहरातील सागर पार्क मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मंगळवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यात मुख्यमंत्री शिंदे हे भाषणासाठी उभे राहताच मैदानात असलेल्या महिलांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली. pic.twitter.com/T1BaRrW7PC
— LoksattaLive (@LoksattaLive) August 14, 2024
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे भाषणासाठी उभे राहताच मैदानात असलेल्या महिलांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मैदानाबाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वारावर लाडक्या बहिणींची गर्दी झाली होती. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी लाडक्या बहिणींना आणण्याची जबाबदारी असलेल्या नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. लाडक्या बहिणींनी मैदानाबाहेर येत थेट पाचशे मीटरवरील आपापल्या बसकडे प्रस्थान केले.