‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, तर ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट माहितीपट ठरला. ये गांव मेरा माहितीपटाचे दिग्दर्शन हरीश पटेल यांनी केले होते. उमेश घेवारीकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट कॅम्पस चित्रपट म्हणून सुकल्या, तर उत्कृष्ट मायबोली लघुपट म्हणून द दप्तराचा ठरला. त्याचे दिग्दर्शक पराग चौधरी यांनी केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी यांच्यातर्फे देवगिरी लघुपट-माहितीपट महोत्सव गेल्या दोन दिवसांपासून डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालय आवारातील विक्रम गोखले चित्रनगरीत पार पडला. महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरण सोहळ्याने झाला. महोत्सवात ९२ पेक्षा अधिक लघुपट, माहितीपटांसह कॅम्पस चित्रपट, मायबोली लघुपट या विषयांवर आधारित चित्रपट आले होते. यातील विजेत्या लघुपटांना पारितोषिके देण्यात आली.
हेही वाचा – नाशिक : इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सोहळ्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे, अभिनेता आरोह वेलणकर, प्रसिद्ध दिग्दर्शक शंतनू रोडे, माहितीपट निर्माते चंद्रशेखर कुलकर्णी, संस्थेचे संचालक प्रा. व. पु. होले, प्रा. एल. व्ही. बोरोले, प्राचार्या डॉ. गौरी राणे, विनीत जोशी, संजय हांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, किरण सोहळे यांनी सूत्रसंचालन केले. विनीत जोशी यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी लघुपट, माहितीपट
सर्वोत्कृष्ट लघुपट : भाई का बड्डे, दिग्दर्शक – उमेश घेवारीकर. द्वितीय: पाखर, दिग्दर्शक – सतीश धुतडमल. तृतीय : द इंडिपेंडन्स डे, दिग्दर्शक – अक्षय भांडवलकर. उत्तेजनार्थ – हप्पी वूमन्स डे, दिग्दर्शक – रोहित चव्हाण. स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड : अलार्म घडी, दिग्दर्शक – शुभम शर्मा.
कॅम्पस फिल्म : सर्वोत्कृष्ट कॅम्पस फिल्म – सुकल्या, दिग्दर्शक – नितीन निकाळे (एमजीएम स्कूल ऑफ फाइन आर्ट), द्वितीय – टेक ईट ईजी, दिग्दर्शक – संजय भोसले (एमजीएम स्कूल ऑफ फाइन आर्ट).
सर्वोत्कृष्ट माहितीपट – ये गांव मेरा, दिग्दर्शक – हरीश पटेल, द्वितीय- सुश्रुत ऑफ मॉडर्न इंडिया, दिग्दर्शक – अविज्ञान किशोरदास, तृतीय – ऑपरेशन उमरी बँक, दिग्दर्शक – भरत वाळके.
हेही वाचा – नाशिक : “सिन्नर धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करावी”; चित्रा वाघ यांची मागणी
सर्वोत्कृष्ट मायबोली लघुपट – द दप्तराचा द, दिग्दर्शक – पराग चौधरी, दिगंबर चौधरी. उत्तेजनार्थ – लोकमान्य बाप्पा, दिग्दर्शक – विशाल जाधव, रमेश जाधव. उत्कृष्ट पटकथा – महासत्ता, दिग्दर्शक – स्वप्नील मुंगे. उत्कृष्ट छायांकन – भाई का बड्डे, आकाश बनकर. उत्कृष्ट बालकलाकार – द दप्तराचा द, यादवी चौधरी. उत्कृष्ट अभिनेता – पाऊस, अथर्व बंगाळे. उत्कृष्ट अभिनेत्री – कल्पना, विदुला बाविस्कर. उत्कृष्ट दिग्दर्शन – भाई का बड्डे, उमेश घेवरीकर.