जळगाव : शिवछत्रपती हा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविण्यासाठी शहरातील ला. ना. विद्यालयातील क्रीडाशिक्षक प्रदीप तळवेलकर यांनी क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहिल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे तळवेलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी हा निकाल दिला.

या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुख शेख यांनी याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले. त्यासंदर्भातील प्रत बुधवारी उपलब्ध झाली. २०१६-१७ या वर्षाचा क्रीडाशिक्षकांसाठी असलेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदीप तळवेलकर यांना मिळाला आहे. त्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाबरोबर त्यांनी सोळा प्रमाणपत्रे जोडली होती. ज्यात ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांना पंच, परीक्षक आणि प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहिल्याचे नमूद करण्यात आले होते. फारुख शेख अब्दुल्ला यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून ला. ना. विद्यालयातून तळवेलकर यांच्या उपस्थितीबाबत माहिती मागविली. त्यात ज्या तारखांना ते जळगावच्या बाहेर वेगवेगळ्या गावांना स्पर्धेसाठी उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र होते, त्या दिवशी ते शाळेतही उपस्थित असल्याचे दिसून आले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा: जळगाव: न्यायमंदिर आवारातच विभक्त पती-पत्नीत हाणामारी; पती गंभीर जखमी

शिवाय, शेख यांनी दिलेल्या ४८ पैकी काही नोंदींमध्ये तळवेलकर हे शाळेत अनुपस्थित, पण कामावर हजर, असे निदर्शनास आले. त्या माहितीच्या आधारे तळवेलकर यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार फारुख शेख अब्दुल्ला यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडेही निवेदन देत मागणी केली. मात्र, गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनीही ती याचिका फेटाळली. त्याविरोधात फारुख शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती.

हेही वाचा: जळगाव: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी

त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्यासमोर सुनावणी होत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिलेले आदेश रद्द करीत तळवेलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. तळवेलकर यांच्यासह राज्यातील प्रशांत जगताप, डी. पी. खिंवसरा, अशोक दुधारे, उदय डोंगरे, ए. एम. पाटील, एल. आर. मौर्य, आसिफ खान अजमल खान, देवदत्त पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे अहवाल सादर करावा, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader