जळगाव – जिल्ह्यात अवैध गौणखनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आता अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. जनतेचे अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचा साठा, उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय विविध विभागांच्या समन्वयातून पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आवश्यक उपाययोजना करून जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला ९२०९२८४०१० या हेल्पलाइन क्रमांकावर जिल्हा प्रशासनाला माहिती देता येईल. नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकावर अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत व्हॉटसअपद्वारे घटनेचे छायाचित्र, चलचित्रफीत, घटनेचे ठिकाण, गुगल लोकेशन कळविल्यास प्राप्त तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. अवैध गौणखनिजाबाबत तक्रार करणार्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मित्तल यांनी केले आहे.

maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?