जळगाव – सध्या उष्णतेने जळगावकर हैराण झाले असून, मान्सूनच्या प्रतीक्षेत असणार्या जिल्ह्यातील अनेक भागांत टंचाईची बिकट स्थिती झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील २५ गावांना २८ टँकर सुरू असून, ७२ गावांसाठी ७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दोन गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, तर दोन गावांना पाच नवीन विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. दिवसागणिक टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प, १३ मध्यम प्रकल्पांसह ९६ लघु प्रकल्प आहेत, तरीही काही तालुक्यांना दरवर्षी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. दरवर्षी अनेक भागातून टँकरची मागणी वाढत आहे. मृग नक्षत्र सुरु झाले तरीही टँकरची मागणी दिवसागणिक वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ गोषवारा अहवालावरून ग्रामीण भागातील टंचाईची बिकट स्थिती समोर आली आहे.

टंचाईच्या सर्वाधिक तीव्र झळा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात बसत आहेत. जामनेर तालुक्यातील सहा गावांना सहा टँकर सुरू असून, त्यांच्या फेर्याही वाढल्या आहेत. तसेच तालुक्यातील २९ गावांत २९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात तीन गावांना तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात तात्पुरती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्यातील नऊ गावांत १० टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून, एका गावात विहिरीचे अधिग्रहण, तर एका गावात तात्पुरती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

जिल्ह्यातील एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा, भुसावळ या तालुक्यांत कमी-अधिक संख्येने टँकर सुरू आहेत. त्यांच्याही फेर्या वाढल्या आहेत.  एरंडोल तालुक्यातील एका गावात विहीर अधिग्रहण, भुसावळ तालुक्यातील दोन गावांत दोन टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून, एका गावात विहीर अधिग्रहण, रावेर तालुक्यातील एका गावात विहीर अधिग्रहण, मुक्ताईनगर तालुक्यातील दहा गावांत ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बोदवड तालुक्यातील एका गावात एक टँकर सुरू असून, चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील तीन गावांत पाच टँकर सुरू असून, चार गावांसाठी सहा विहिरींचे अधिग्रहण, भडगाव तालुक्यातील दोन गावांत दोन टँकर, तर दोन गावांत दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील नऊ गावांसाठी नऊ विहिरींचे अधिग्रहण, तर पारोळा तालुक्यातील दोन गावांत दोन टँकर सुरू असून, सहा गावांसाठी सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चोपडा तालुक्यात एका गावासाठी दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

तालुकानिहाय टँकर सुरू असलेली गावे

जामनेर- मोरगाव, रोटवद, नेरी दिगर, किन्ही, एकुलती बुद्रुक, वाडी, भडगाव – तळबंदतांडा, वसंतवाडी, बोदवड – एनगाव, पारोळा – हनुमंतखेडा, खेडीढोक, चाळीसगाव – मौजे पिंपळगाव, विसापूर तांडा, रोहिणी, अंधारी, हातगाव, तमगव्हाण, न्हावे, ढोमणे, राजदेहरे, भुसावळ -कंडारी, कुर्हे, पाचोरा – रामेश्वर, लोहारा, म्हसास