नाशिक : जळगाव जिल्ह्यातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवार यांच्या बंडाला साथ देत मंत्रिमंडळात स्थान मिळविले. विशेष म्हणजे, अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. पाटील यांनी भाजपमधून राजकारणाला सुरुवात केली होती. अमळनेर तालुक्यातील मारवड-डांगरी गटातून ते प्रथम भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या पाटील यांनी २०१४ मध्ये भाजपकडून प्रथमच अमळनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती.
परंतु, मोदी लाट असतानाही अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी हे पाटील यांचा पराभव करुन निवडून आले होते. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. पहिल्यांदाच आमदार झालेल्या अनिल पाटील यांना अचानक मंत्रिपदाची लाॅटरी लागली असे म्हणावे लागेल. यामुळे जळगाव जिल्ह्यास आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यानंतर तिसरे मंत्री लाभले आहेत. पाटील यांनी याआधी अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवेळीही त्यांच्या पाठीशी होते. पाटील यांच्या पत्नीही राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेअनिल पाटील यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यास तिसरे मंत्रिपदत.