लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या इतर संचालकांशी संपर्क करीत सभेला न जाण्याचा आदेशच दिल्याचा आरोप करीत जे संचालक आले नाहीत, त्यांना शेतकरी हित मान्य नसेलच, असा आरोप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी करीत आता १५ एप्रिलला जिल्हा बँकेची तहकूब सभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता जिल्हा बँकेत अध्यक्षांनाच स्वपक्षाकडूनच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीनंतर सोमवारी सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. गणपूर्तीसाठी ११ संचालक हवे होते. मात्र, अध्यक्ष पवार यांच्यासह उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक प्रताप हरी पाटील, मेहताबसिंग नाईक, शैलजादेवी निकम व काँग्रेसच्या जनाबाई महाजन उपस्थित होत्या. बँकेचे सरव्यवस्थापक जितेंद्र देशमुख हेही उपस्थित होते. दुपारी साडेतीनपर्यंत संचालकांची प्रतीक्षा करण्यात आली. सभेसाठी २२ पैकी सहा संचालकांची हजेरी होती. त्यानंतर अध्यक्ष पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्वपक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशानेच इतर संचालक सभेसाठी आले नसल्याचा आरोप करीत स्वपक्षावरच टीकास्त्र सोडले.
हेही वाचा…. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व गुलाबराव देवकर यांचा नामोल्लेख न करता, अध्यक्ष संजय पवार म्हणाले की, स्वपक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनीच इतर संचालकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आदेश देत सभेला उपस्थित न राहण्याबाबत स्वपक्षाच्या दोन संचालकांनीच मला सांगितले आहे. बैठकीत शेतकरी हिताचे विविध निर्णय घ्यायचे होते. त्यात कर्जवाटपासह विविध कार्यकारी सोसायट्यांसह कर्जवसुली व इतर विषयांवर निर्णय होणार होते. मात्र, जे संचालक आले नाहीत, त्यांना शेतकरी हित मान्य नसेल कदाचित. त्या दोन ज्येष्ठ संचालकांना पराभव जिव्हारी लागला आहे, असे मला वाटते. शक्यतो स्वपक्षाचेच संचालक सभेला आलेले नाहीत, असे सांगत यापूर्वी मी बँकेच्या प्रत्येक सभेला हजर होतो. गुलाबराव देवकर हे अध्यक्ष राहिले. त्यानंतर रोहिणी खडसे- खेवलकर या सात वर्षे अध्यक्षपदावर होत्या; पण आम्ही कधीही असे केले नाही. रोहिणी खडसे या तर भाजपच्या अध्यक्षा होत्या, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालकच उपस्थित राहत होते. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत जाणार आहे.
हेही वाचा…. रामशेजच्या पोटात ११ गुहा; शिवकार्य गडकोटची अभ्यास मोहीम
बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० संचालक आहेत. अध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून नाव निश्चित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करीत स्वपक्षाचेच संजय पवार यांनी आयत्यावेळी शिंदे गटाच्या मदतीने विजय मिळविला आहे. पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात एकनाथ खडसेंना मोठा धक्का होता. त्यावेळी खडसेंनी महाविकास आघाडीतील पक्षांनी केलेली गद्दारी आणि विश्वासघातामुळे जिल्हा बँक हातून निसटल्याचे म्हटले होते. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले होते. आता बँकेच्या पहिल्याच सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार खडसेंसह देवकर, डॉ. सतीश पाटील, अॅड. रवींद्र पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, घनश्याम अग्रवाल, आमदार अनिल पाटील, नाना राजमल पाटील हे नऊ संचालक अनुपस्थित राहिले.
सभेला अनुपस्थितीची कारणे
आमदार खडसेंनी एलएक्यूसंदर्भात बुलडाणा येथील जिल्हाधिकार्यांसोबतच्या बैठकीस उपस्थितीचे, आमदार अनिल पाटील यांनी शस्त्रक्रिया झाल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील यांनी बाजार समितीसह सोसायटीच्या निवडणुकीचे कारण दिले आहे. बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांचे कारण दिले आहे. मंत्री यांनी बाहेरगावी खासगी कामानिमित्त असल्याने सभेला अनुपस्थितीबाबत अर्ज दिल्याचे सांगितले आहे. संजय पवार यांनी विनाकारण आरोप करू नये, पक्षाकडून कुणालाही सभेला उपस्थित न राहण्याबाबत सांगितलेले नाही. प्रत्येकाची सभेला येण्याची कारणे असू शकतात. संजय पवार ज्यांच्या पाठिंब्याने अध्यक्षपदी विराजमान झाले, त्यांना सभेसाठी बोलाविले असते, तरी गणपूर्ती झाली असती, असे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी म्हटले आहे.