लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : राज्यातील मोठे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय म्हणजे शरणागती पत्करली असून, तुरुंगवारी टाळण्यासाठीच ते घरवापसी करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे. शरद पवार यांना खडसे यांनी संकटकाळात धोका दिल्याचा आरोपही केला.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
Bangladeshi infiltrators Dhule, Four Bangladeshi infiltrators arrested, Bangladeshi infiltrators,
धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते खडसे यांनी रविवारी १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. खडसे यांच्या या निर्णयावर अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पवार यांनी टीका केली आहे. खडसे हे भाजपमध्ये जाणार असे ऐकले. एवढा मोठा माणूस आहे, एवढे मोठे नेते आहेत. खडसे हे राजकीय विजनवासात होते, त्यावेळी शरद पवार यांनी खडसेंना आसरा दिला, संकटकाळात विधान परिषदेचे सदस्यत्वही बहाल केले. आता कोणतेही कारण नसताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. शरद पवार यांना धोका देत आहेत. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याचे आपण वारंवार सांगितले होते. ते आल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा गट वेगळा झाला. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील हे नाराज आहेत. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन पक्षात वाद घडवून आणले. अ‍ॅड. रवींद्र पाटील आणि आमच्यातही खडसेंनी वाद लावले. जिल्हा बँकेत आमच्यात वाद लावले. सर्व समाजांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न खडसेंनी केला, असा आरोपही संजय पवार यांनी केला.

आणखी वाचा-“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, कुणी त्यांच्यासोबत आले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाताहेत, तर त्यांच्यासोबत कुणीही जात नाही. खडसेंनी उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसला फसवले. आता शरद पवारांना फसवले. धोका दिला, गद्दारी केली, असेच म्हणावे लागेल. राजकीय घडामोडी पाहता, रक्षा खडसेंना थांबवून एकनाथ खडसेंना उमेदवार करतील, असे वाटते आहे. आता खडसे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भाजपची उमेदवारी करावी, असे आव्हानही पवार यांनी खडसेंना दिले. अजून पक्षप्रवेश झालेला नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहावे, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.

Story img Loader