जळगाव – कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्यस्तरावर, तर पाच शेतकऱ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

पीक स्पर्धेत राज्यस्तरावर रब्बी ज्वारीमध्ये सर्वसाधारण गटात जिल्ह्यातील पिंपरखेड (ता. भडगाव) येथील प्रमोद माळी प्रथम, वरखेड (ता. भडगाव) येथील उमेश पाटील द्वितीय, तर विभागीय स्तरावर खर्चाणे (ता. जामनेर) येथील रमेश पाटील प्रथम, केकतनिंभोरा (ता. जामनेर) येथील लताबाई महाजन द्वितीय आणि सामरोद (ता. जामनेर) येथील स्वप्नील पाटील यांची तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. हरभरा पिकात विभागीय स्तरावर सर्वसाधारण गटात कोरपावली (ता. यावल) येथील राकेश फेगडे तृतीय आणि आदिवासी गटात वाघझिरा (ता. यावल) येथील सावित्रीबाई बारेला यांची तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.

Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
Deputy Superintendent of Police Rekha Sankpal awarded Central Home Minister Vigilance Medal Nagpur news
पोलीस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’; नागपुरातून बाळ विकणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मकोका
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
पेट्रोल पंपचालकांची दिवाळी यंदा गोड! सरकारकडून कमिशनमध्ये वाढ; भाववाढ नसल्याने ग्राहकांनाही दिलासा
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद

हेही वाचा – धुळ्याहून लवकरच मनमाडमार्गे दादर रेल्वेगाडी -प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस सेवा

हेही वाचा – नाशिक : राजकीय व्यक्तींकडून अश्लाघ्य भाषेचा वापर वाढलाय, विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली चिंता

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा कृषी विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली होती, असे ठाकूर यांनी सांगितले.