जळगाव : शहरात रस्तेकामे सुरू आहेत; पण कामे करताना रस्त्यालगत असलेल्या जलवाहिन्यांचे व्हॉल्व्हही बुजविल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यावेळी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. ती पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षांची असताना कामे पूर्ण होण्यास सहा वर्षे लागली. पहिल्या टप्प्यातील ९५ टक्के काम झाले असून, ८० हजारांवर नळजोडण्या दिल्या गेल्या. दुसर्या टप्प्यांतर्गत महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठविलेल्या प्रकल्प अहवालास राज्य सरकारकडून जानेवारी २०२४ अखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येऊन पुढील दिवाळीपर्यंत जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे. त्यानंतर जुनी जलवाहिनी बंद होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा