जळगाव : लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी, देश आणि समाजहितासाठी शहरातील मुस्लिम समाजातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य व परिसरातील समाजबांधव शंभर टक्के मतदान करणार आणि समाजबांधवांकडून करवून घेणार, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंटने पुढाकार घेतला आहे.

निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपक्रमांतून मतदार जनजागृती केली जात आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व पवित्र कार्य म्हणून शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी एकत्रित येऊन मणियारवाडा भागात प्रतिज्ञा घेतली. त्यासाठी महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट (एमडीएफ) या अराजकीय संघटनेने पुढाकार घेतला असून, संघटनेतर्फे मुस्लिमच नव्हे; तर समाजातील प्रत्येक घटकाने भारताची लोकशाही व संविधानाच्या सुरक्षिततेसाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा; त्यासोबत अशा व्यक्तींना मतदान करावे; जे देश व समाजाच्या हितासाठी कार्य करणार आहेत. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शहरातील प्रत्येक मोहल्लानिहाय बैठका होत असून, प्रत्येक मतदाराला मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्याचप्रमाणे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे आवाहन केले आहे, त्याबाबतसुद्धा मतदारांना सामाजिक व धार्मिक उत्तरदायित्व म्हणून मतदान करा, असे आवाहन केले जात आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह

हेही वाचा >>> नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क – अजित पवार गटाचा ठराव

महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंटचे जिल्ह्यातील समन्वयक म्हणून मुफ्ती हारुन नदवी व फारुक शेख अब्दुल्ला, तर जिल्हा समन्वयक म्हणून आरीफ देशमुख हे कार्यरत आहेत. शहरातील रथ चौक, कोळी पेठ भागातील मणियारवाड्यात मणियार बिरादरी, शिकलगर बिरादरी, खाटीक बिरादरी, पिंजारी बिरादरी व इतर बिरादरी या संमिश्र रहिवासी भागात मोहल्ला समितीची बैठक घेण्यात आली. मणियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंटचे फारुक शेख, जिल्हा संघटक आरीफ देशमुख यांच्यासह एमजेपीचे मेहमूद शेख उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वात उपस्थित मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.