जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे २०२३ मध्ये ११ हजार ९२० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसला आहे. २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या तुलनेत या प्रतिबंधात्मक कारवाईत २०२३ मध्ये वाढ झाली आहे.

समाजात शांतता प्रस्थापित करणे, कायदा- सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांवर वचक बसविणे, हातभट्टीवरील अनधिकृत दारू विक्रीला पायबंद घालणे, यासाठी दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येत आहे. गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. २०२१ मध्ये आठ हजार ८०६ आणि २०२२ मध्ये नऊ हजार ८३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

हेही वाचा…नाशिक: जिल्हा परिषदेतर्फे मंदिरांची स्वच्छता मोहीम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक कारवाईबाबत घ्यावयाची दक्षता या विषयावर संयुक्त कार्यशाळाही घेण्यात आली. सीआरपीसी १०७, १०९ आणि ११० मध्ये पोलीस विभागाने परिपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावेत, रोजनामा कसा लिहावा, नोटिसा कशा काढाव्यात, याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन केले गेले.

शासकीय कामांत अडथळा आणून सरकारी अधिकारी- कर्मचारी व पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. निवडणुकांसह आंदोलनाच्या काळात महसूल विभागाचे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करताना महसूल व पोलीस विभागाकडून समन्वय ठेवला जात आहे, असे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.