जळगाव: विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यात स्वपक्षाविरोधात बंड पुकारणाऱ्यांविरोधात भाजपने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु, अशा कारवाईत सर्व बंडखोरांना समान न्याय देण्याऐवजी माजी खासदारासह काही जणांना मोकळीक देण्यात आल्याने कारवाई झालेल्या बंडखोरांमध्ये नाराजी आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी न ऐकणाऱ्या बंडखोरांसाठी पक्षाची दारे सहा वर्षांसाठी बंद होतील, असा इशारा अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच दिला होता. त्यानुसार भाजप प्रदेश कार्यालयाने ३७ मतदारसंघातील पक्षाचा आदेश न जुमानणाऱ्या ४० बंडखोरांवर कारवाई केली आहे. शिस्तभंग केल्याबद्दल संबंधितांची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे तसेच माजी नगरसेवक मयूर कापसे यांचाही समावेश आहे.

congress suspend 6 rebellion leaders
अखेर काँग्रेसनेही घेतला कठोर निर्णय…माजी मंत्र्यांसह तब्बल सहा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

हेही वाचा :नाशिक : परिमंडळ दोन अंतर्गत २० गुन्हेगार तडीपार

पाचोरा मतदारसंघात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली आहे. तसेच भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी एरंडोल मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या विरोधातील अपक्ष अर्ज मागे घेतला नाही. दोघांनी बंडखोरी करून शिंदे गटासमोर आव्हान निर्माण केले आहे. परंतु, भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये ए. टी. पाटील आणि अमोल शिंदे यांचा समावेश नाही. त्यामुळे भाजपकडून शिस्तभंग कारवाईत दुजाभाव करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

हेही वाचा :आदिवासी विद्यार्थ्यांना आता सामाजिक, भावनिक शिक्षण – ”अभिव्यक्ती” प्रकल्प

प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणे आवश्यक

विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधितांवर आता टप्याटप्याने शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. ज्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे, त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा तातडीने दिला पाहिजे.

डॉ. राधेश्याम चौधरी (लोकसभा क्षेत्र प्रमुख, जळगाव भाजप)

Story img Loader