लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरू करणाऱ्या ‘जनस्थान’ चा नववा वर्धापनदिन १८ ते २४ जून या कालावधीत साजरा होत असून त्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, चित्रकार आनंद ढाकिफळे, ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक सुरेश गायधनी आणि अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते चिन्मय उदगीरकर यांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याबाबतची माहिती जनस्थानचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली. ‘जनस्थान’ हा समाज माध्यमावरील गट दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होणार असून यात २२ जून रोजी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात जनस्थान आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

हेही वाचा… नाशिक: शाळा इमारत बदलल्याने पालकांचा ठिय्या; संस्थेकडून चर्चेचा मार्ग

नाशिकच्या सांस्कृतिक कला जीवनात आपल्या कलेच्या सेवेतून योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि पद्मविभूषण एन्. राजन यांचे शिष्य अनिल दैठणकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आजवर विविध कार्यक्रमांमध्ये व्हायोलिनची साथसंगत करण्याबरोबर त्यांनी स्वतंत्रपणे राज्यभर मैफली केल्या आहेत. आनंद ढाकिफळे एक अष्टपैलू कलावंत असून चित्रकला हा त्यांचा मुख्य विषय आहे. जुन्या काळातील साईन बोर्ड, नाटकाचे नेपथ्य, शिल्पकला, चित्ररथ अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण काम त्यांनी केले आहे.

हेही वाचा… जळगाव: अखेर ती २९ मुले १४ दिवसांनंतर बिहार कडे रवाना,भुसावळहून भागलपूर एक्स्प्रेसने प्रवास

सुरेश गायधनी हे ४० वर्ष नाटक या विषयासाठी काम करीत आहे. अभिनय, दिग्दर्शन, प्रकाश योजना याबरोबर राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. चिन्मय उदगीरकर हे सध्याच्या मराठी चित्रपट, मालिका, नाट्य क्षेत्रातील नव्या पिढीतले दमदार नाव असून गोदावरी शुद्धीकरण, पर्यावरण वाचवा चळवळ अशा सामाजिक मोहिमेतही ते आघाडीवर आहेत. या चौघांनाही ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.