कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांच्या हस्तकौशल्याचा अनुभव आला. प्रामुख्याने महिलांना चोरांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्र्यंबकेश्वर येथे रविवारी कार्तिकी एकादशीनिमित्त संत निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर्शनानंतर घरी परतण्यासाठी बस स्थानकात ते थांबले होते. त्यानंतर सिटीलिंक या शहर बसने प्रवास करत असतांना सीताबाई मेढे (६०, रा. अंबोली) यांच्यासह सिन्नर येथील विमल कातकाडे, निफाड येथील इंदुबाई बोडके, तेलंगना येथील सुशीला रुंद्रा, कल्याण येथील शोभा आवळे, त्र्यंबकेश्वर येथील शैलजा लोहगांवकर यांचे मंगळसूत्र अशा प्रकारे अंदाजे एक लाख, ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelery stolen from woman who came for trimbakeshwar amy
Show comments