कामगार मंत्र्यांचा इशारा, कारखान्यात २६ तासानंतरही धूर कायम

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कारखान्यात रविवारी सकाळी लागलेली आग २६ तासानंतर काहिशी नियंत्रणात आली असली तरी परिसरातून अजूनही धूर निघत आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर, १८ जण जखमी होऊनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. प्रारंभी बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याचा व्यक्त झालेला संशय निराधार ठरला. कारण, बॉयलर शाबूत असून त्याची हानी झालेली नाही. त्यामुळे दुर्घटनेच्या कारणाचे गूढ वाढले आहे. तज्ज्ञ पथकांनी पाहणी केल्यानंतर कारणमिंमासा होईल. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात असून चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…

नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव शिवारातील १२५ एकर क्षेत्रात जिंदाल समुहाचा पॉलीफिल्म निर्मितीचा प्रकल्प आहे. त्यातील पॉली उत्पादन विभागात सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली होती. ज्वलनशील रासायनिक पदार्थांमुळे भडकलेली आग शमविण्यात अद्याप यश आलेले नाही. २५ पथके आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोमवारी कामगारमंत्री सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रसायन संपुष्टात येईपर्यंत आगीची धग जाणवेल. सोमवारी संध्याकाळपर्यंत ती शमविण्यात यश येईल, अशी आशा उभयतांनी व्यक्त केली. प्रकल्पातील बॉयलरचा आगीच्या दुर्घटनेशी कुठलाही संबंध नाही. दुर्घटनेचे कारण तज्ज्ञांनी पाहणी केल्यानंतर लक्षात येईल. चौकशी पूर्ण झालेली नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जिंदाल कारखान्यातील स्फोटात दोन महिला दगावल्या ;नाशिकमधील दुर्घटनेत १७ जखमी

कारखान्यातील कामगार संख्येबाबत कामगार विभागही अनभिज्ञ आहे. ही माहिती त्वरित देण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. ज्या विभागात आग लागली, तेथील कामगारांच्या आकडेवारीबाबत साशंकता आहे. रविवार असल्याने तिथे नेहमीपेक्षा कमी कामगार होते. दैनंदिन हजेरी पट, जखमींकडून माहिती घेतली गेली. तरीदेखील कारखान्यात आणखी कुणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. कुणी बेपत्ता आहे हे सांगण्यास नातेवाईक पुढे आलेले नाहीत. या प्रकल्पाचे सुरक्षाविषयक परीक्षण झालेले आहे. व्यवस्थापनाने नियमांचे पालन केले की नाही, याची छाननी केली जाईल. ज्वलनशील रसायनांमुळे आग पुन्हा भडकू शकते. त्यामुळे आवारातील भंगार साहित्य बाजूला हटवून मार्ग मोकळा राखण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रकल्पाचा वीज पुरवठा बंद असल्याने कामगार संख्येची संगणकीय माहिती प्राप्त झालेली नाही. आग शमविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भुकटीचा वापर करण्याची सूचनाही खाडे यांनी केली.

Story img Loader