छगन भुजबळ यांना दिलेल्या वागणुकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. आव्हाड यांनी आपल्या भाषणात राफेल ते नथुराम गोडसे आणि भगवा ते भाजपाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला.

नाशिकच्या समस्या ते बंद करण्यात आलेल्या कारखान्यांमुळे स्थानिक तरुणांचे रोजगार कसे बंद केले यावर त्यांनी भाजपावर शरसंधान साधले. या सभेत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी शहीद केशव गोसावी यांच्या पत्नी काव्या गोसावी यांना विद्यार्थ्यांनी जमवलेला ५० हजारांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

Story img Loader