लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: बदनामीकारक बातमी देण्याची धमकी देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकाकडून ६० हजाराची खंडणी उकळल्या प्रकरणी स्थानिक वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Mukesh Chandrakar Murder Case.
Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा
Chhattisgarh, Mukesh Chandrakar murder,
तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न, काँग्रेस नेत्याचा भ्रष्टाचार उघड केल्याने…
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
Kalyan Crime : कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कल्पेश लचके (तांबे बिल्डींग, मखमलाबाद नाका) असे अटक केलेल्या संशयित पत्रकाराचे नाव आहे. याबाबत गणपतराव पाटील (जऊळके वणी, दिंडोरी) यांनी तक्रार दिली. पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आहेत. संशयित कल्पेश हा लोकशाही वृत्त वाहिनीचा पत्रकार असल्याचे सांगितले जाते. संशयिताने पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मखमलाबाद नाका येथील आपल्या लोकशाही वृत्त वाहिनीच्या कार्यालयात बोलावून घेतले.

हेही वाचा… जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर; अनिल दैठणकर, आनंद ढाकिफळे, सुरेश गायधनी, चिन्मय उदगीरकर यांचा समावेश

भोई नावाच्या व्यक्तीने एका बँकेतून घेतलेल्या कर्जाबाबत तक्रार केल्याचे सांगितले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली जाईल तसेच याबाबतची बातमी पेपरला देणार असल्याचे धमकावले. हे प्रकरण मिटविण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी त्याने केली. तडजोडीअंती ६० हजार रुपयांची खंडणी देण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा… नाशिक: शाळा इमारत बदलल्याने पालकांचा ठिय्या; संस्थेकडून चर्चेचा मार्ग

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित पत्रकार लचके विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अलीकडेच कथित पर्यावरणप्रेमी दीपक जाधव याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. शहरात परवानगीनुसार वृक्षतोड करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास मनपाकडे ऑनलाईन तक्रार न करण्यासाठी संशयिताने दरमहा २० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. महत्वाची बाब म्हणजे, संशयिताने याबाबतची नोटरी केली होती.

Story img Loader