जळगाव : चोपडा येथील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तालुक्यात व शहरात फोफावलेल्या भ्रष्टाचाराला लगाम घालावा यासाठी जनसंघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी नगरपरिषदेच्या दालनात मुख्याधिकारी हेमंत निकम यांचा सत्कार केला.चोपडा शहरातील विविध समस्यांवर चर्चा करीत निकृष्ट रस्ते तयार करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी, त्या ठेकदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जनसंघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी केली. चोपडा शहरातील बहुतांश भागात पथदिवे नेहमी बंद असतात, तसेच जागोजागी कचर्‍याचे ढीग दिसून येतात. शहरात १० ते १२ दिवसानंतर पाणी येते. यावर योग्य ते नियोजन करून शहरवासियांना किमान दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. रवींद्र पाटील यांनी केली आहे.

नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित सभेत व्यापारी मंडळाचे अध्यथ तथा जनसंघर्ष मोर्चाचे प्रमुख अमृतराज सचदेव, माजी नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, कोट्यवधी रुपये खर्च करून अवघ्या सहा महिन्यांत रस्त्यांची अवस्था जर खराब होत असेल आणि पुन्हा त्याच रस्त्यांसाठी निविदा निघत असतील, तर हे अत्यंत भयावह आहे. ठेकेदाराला टक्केवारी द्यावी लागत असल्याने ठेकेदार निकृष्ट प्रकारचे रस्ते तयार करतो. त्या रस्त्यांचे आयुष्य अवघे सहा महिन्यांवर येऊन जाते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : चोपड्यात आज रथोत्सव ; व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षांचा उपक्रम

यापुढे चोपडा शहरात व तालुक्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात कृती केली, तर जनसंघर्ष मोर्चा निश्‍चितच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही मोर्चाच्या प्रमुखांनी दिली. चोपडा नगरपरिषदेला लाभलेले मुख्याधिकारी हेमंत निकम हे अत्यंत कर्तव्यदक्ष असून, त्यांच्याकडून भ्रष्टाचाराला व टक्केवारीला निश्‍चित लगाम लागेल, असा आशावाद जनसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवीण गुजराथी, नरेश महाजन, माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, नरेंद्र तोतला, प्रमोद अग्रवाल आदी उपस्थित होते.

Story img Loader