शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील व उपसभापतीपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड झाली. जनक विला निवासस्थानी असलेल्या आमदार कार्यालयात माजीमंत्री आमदार पटेल यांनी सोमवारी सकाळी सर्व संचालकांची बैठक घेऊन सभापती पदासाठी के. डी. पाटील व उपसभापती पदासाठी लक्ष्मीकांत पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले.
यावेळी आमदार अमरिश पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विशेष लेखा परीक्षक व्ही. बी. पापूलकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल ऐंडाईत यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी अकरा वाजता पार पडली. यावेळी सभापतीपदी के. डी. पाटील व उपसभापती लक्ष्मीकांत पाटील यांची निवड झाली. यानंतर आमदार अमरिश पटेल यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हेही वाचा >>>धुळे: पणन केंद्रासाठी भारत राष्ट्र समितीचे घंटानाद आंदोलन
यावेळी नवनिर्वाचित सभापती कांतीलाल दगा पाटील उर्फ के.डी.पाटील, उपसभापती लक्ष्मीकांत बापुराव पाटील, किरण बद्रीनाथ गुजराथी, शांतीलाल इंद्रसिंग जमादार, अरविंददास आनंदा पाटील, चंदू धोंडू पाटील, शिवाजी धनगर पाटील, विठोबा सिताराम महाजन, मेघा राजेंद्र पाटील, मनीषा राजकपूर मराठे, प्रसाद मोहन पाटील, कृष्णा गेंदाराम पावरा, आनंदसिंग दर्यावसिंग राऊळ, जगन सुपा पावरा, मिलींद दौलतराव बोरसे, अर्पित घनशाम अग्रवाल, सतिष दगडूलाल जैन, किरण जतन कढरे उपस्थित होते.