नंदुरबार – राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. छत्तीसगढमध्ये पकडलेल्या नक्षलवाद्यांकडे चीनची हत्यारे मिळाली. यावरुनच अशा घटनांना विदेशी रसद मिळत असल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले. कॉग्रेस शासीत राज्यातच लव्ह जिहादच्या घटनांची संख्यामोठी असून भाजपा शासीत राज्यात अशांवर कठोर कारवाई होत असल्याने असा घटना नियंत्रीत असल्याचे देखील कैलाश विजयवर्गीय म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोदी ॲट नऊ मोहिमेतंर्गत जिल्हा दौऱ्यावर असलेले विजयवर्गीय यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. जी अमेरिका मोदींना व्हिसा नाकारत होती, तीच आज लाल गालिचा अंथरत असल्याचे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादच्या मुद्यावरुन त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना लक्ष्य केले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये लव्ह जिहादसारख्या घटना जास्त असून भाजपशासित राज्यात अशा लोकांवर कारवाया होत असल्याने या घटना नियंत्रित असल्याचे त्यांनी सांगितले. इंधनाच्या किंमती कधी नियंत्रणात येणार, या प्रश्नावर त्यांनी घूमजाव करीत अनेक देशांच्या तुलनेत भारतात महागाई कमी असल्याचे सांगितले. नऊ वर्षात मोदी सरकार विरोधात भ्रष्ट्राचाराचा एकही गंभीर आरोप झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी विनय तेंडुलकर, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी, भाजप महामंत्री विजय चौधरी, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, राजेंद्र गावित आदि उपस्थित होते.