लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: सुरगाणा तालुक्यातील उंबरठा वनपरीक्षेत्रात खैराची तस्करी करणाऱ्यांना वन कर्मचाऱ्यांनी हटकले असता धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दोन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले.
बोरीपाडा वनक्षेत्राचे नवनाथ बंगाळ हे सोमवारी ११ वाजेच्या सुमारास चापवाडी गावात काम करत असतांना वृक्षांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली. खातरजमा करण्यासाठी जंगलात तपासणी करत असतांना काही जण सादड्याचे झाड इलेक्ट्रॉनिक करवतीने कापत असल्याचे आढळून आले. त्याबद्दल विचारणा केली असता हे झाड मालकीचे असल्याचे त्यांनी वनरक्षकास सांगितले.
हेही वाचा… जळगाव: वायू प्रदुषणाचा शेतीवर परिणाम; दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
वनरक्षकाने करवत ताब्यात घेऊन उंबरठाण येथे वनपरीक्षेत्र कार्यालयात येण्यास बजावले. त्याचा राग आल्याने रस्त्यात पाठलाग करुन करवत हिसकावून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करुन दुचाकीवरून ढकलून दिले. याबाबत कांतीलाल चौधरी, योगेश चौधरी, नितीन राऊत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… जळगाव: वायू प्रदुषणाचा शेतीवर परिणाम; दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
दरम्यान, तस्करीमुळे सागवान या वनपरीक्षेत्रात आढळतही नसून आता खुंटविहीर, रानविहीर, पिंपळसोंड, तापानी, उंबरपाडा, चिंचमाळ, बर्डा, या भागातील खैराच्या झाडाकडे तस्करांनी आपला मोर्चा वळवला आहे.