आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एकाचे अपहरण करत जबर मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित जितेंद्र कुटे आणि त्याचे चार साथीदार, वडजे वकील यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी तक्रारदारच्या माहितीवर पोलिसांनी संशय व्यक्त करत मौन बाळगले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिडको येथील रहिवासी शांताराम जगताप यांचे जितेंद्र कुटे यांच्यासोबत काही आर्थिक देवघेवीवरून वाद होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता जगताप यांना तडजोड करण्यासाठी अशोका मार्ग येथील सिद्धिविनायक सोसायटी परिसरात बोलावून घेत पैसे का दिले नाही म्हणून कुटे यांनी जाब विचारला. उभयतांमध्ये वाद सुरू असताना कुटे यांच्या सहकाऱ्यांनी जगताप यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाण केल्यावर संशयितांनी वडजे वकिलांच्या स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने आपणास डांबले. गाडीत मारहाण करण्यात आली. तीन दिवस कारमध्येच डांबून अपहरणकर्त्यांनी शिर्डी, त्र्यंबकेश्वर, शिरवाडे वणी, नांदुर नाका, आडगाव येथे नेले. आपल्या खिशातील १४,५०० रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच हा प्रकार पोलिसांना सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे. अपहरणकर्त्यांकडून सुटका झाल्यानंतर जगताप यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार संशयास्पद असून विनाकारण संशयितांना गोवण्याचा प्रयत्न होत आहे का, याची चाचपणी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.