धुळे – आजवरच्या कुठल्याच लोकप्रतिनिधींनी अल्पसंख्यांक भागात विकास केला नाही, असे म्हणताना निदान मनाची तरी लाज ठेवा, असे सुनावत स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार यांनी आमदार फारूक शहा यांच्यावर धार्मिक सलोख्याला नख लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप केला.

भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याविरुद्ध बोलण्याआधी आपण त्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या कितीदा झिजवल्या, तेही जनतेला कळू द्या, असेही कुलेवार यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व भागात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने आपण बेचैन झाला आहात. यामुळे तुम्ही धर्मिकतेच्या कुबड्यांवर आपले पद आणि प्रतिष्ठा टिकविण्यासाठी धडपड करीत आहात. भाजपचे अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन या सर्वांनी धुळे शहराच्या सर्वांगीण विकासाची स्वप्न पहिली आहेत. त्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून दिलेली आश्वासने पाळली जात आहेत, असा दावाही कुलेवार यांनी केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – जळगाव : अरे बापरे… नववीतील विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी बंदूक

कुलेवार यांनी आमदार शहा यांचा उल्लेख बारूद असा केला आहे. जनता समजदार असून त्यांच्या भूलथापांना बळी पडत नसल्याने त्यांचा बोलण्यातील तोल सुटत आहे. पाणी पुरवठा, शहरातील रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, पथदिवे अशा सर्व सुविधा पुरविताना सत्ताधारी भाजपाने आश्वासक निर्णय घेऊन जनमान्य अशी कृती केली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Story img Loader