नाशिक – किर्लोस्कर ग्रुपच्या वतीने आयोजित १३ वा किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव सोमवारपासून येथील गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतन महाविद्यालयात भरविण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता प्राचार्य  श्रीहरी उपासनी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 

भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा, या विषयावर लक्ष केंद्रित करणारा भारतातील पहिला महोत्सव असेल. यंदा महोत्सव  सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज या विषयावर होणार आहे.  यावेळी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, संयोजक वीरेंद्र चित्राव,  किर्लोस्कर ऑईल नाशिकचे केंद्रप्रमुख परेश जोशी, व्यवस्थापक राहुल बोरसे यांची उपस्थिती राहील. डॉ. मंदार दातार (पुणे) यांना ’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’, प्रा. डॉ. संजय औटी (नाशिक) यांना ’वसुंधरा मित्र – हरित शिक्षक’ तर बसवंत हनी बी पार्क (पिंपळगाव बसवंत) यांना ’वसुंधरा मित्र संस्था’ असे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. महोत्सवात पर्यावरण विषयक माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवात  एंचँटिंग इंडिया’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नाशिककरांनी महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शहर परिसरातील अन्य महाविद्यालयांमध्ये महोत्सवाच्या अनुषंगाने व्याख्याने होणार आहेत.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार