नाशिक – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसरात शनिवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जागर जोगवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत ३१ भजनी मंडळातील ७०० हून अधिक महिला भाविक सहभागी होऊन रेणुका देवीची आराधना करतील. तसेच दीपोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्व. चतुर्भुज बजरंगलाल चौधरी प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास चांदवड येथील श्री रेणुका देवी संस्थान आणि नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीची साथ मिळाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर, कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत चांदवडच्या श्री रेणुका देवी संस्थान येथे ३१ भजनी मंडळाचा जागर जोगवा कार्यक्रम होणारआहे. त्या अंतर्गत ध्वजारोहण व ढोल ताशांसह टाळ, मृदुंगाच्या गजरात श्री रेणुकादेवी पालखी सोहळा होईल. महिला भाविकांच्या उपस्थितीत जागर जोगवा व भजनांचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील भजनी मंडळांचा तसेच गुरुजनांचा सन्मान सोहळा यावेळी पार पडेल.

हेही वाचा >>>बदनामीप्रकरणी दादा भुसे यांची सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध नोटीस

एकाचवेळी ७०० महिलांचा सहभाग असलेला महाआरती सोहळा आणि ५०१ पणत्यांचा दीपोत्सव उपस्थित भाविकांसाठी अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक म्हणून जितेंद्र येवले आणि योगेश कासार हे काम बघत आहेत. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्षा तृप्तिदा काटकर, सचिव संगिता वेढणे, उपाध्यक्षा पद्मिनी काळे व उत्सव समितीच्या सदस्यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kojagiri pornima has deepotsav and 31 bhajani mandals participate in jagar jogwa in chandwad temple amy