जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथील शेतकर्याच्या हिश्श्याची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठ्यासह कोतवालास गुरुवारी सापळा रचत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. याबाबत चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बोरखेडा येथील शेतकर्याच्या नावावर वडिलोपार्जित शेती आहे. तक्रारदारांच्या हिश्श्यावर एकूण तीन गट वाटणीस आले आहेत. संबंधित तीन गटांपैकी काही शेतजमीन तक्रारदारांना त्यांच्या पत्नीच्या नावे करायची आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये तलाठी ज्ञानेश्वर काळे (५०, बोरखेडा, चाळीसगाव) यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकरण सादर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक : आनंदवलीतील दर्ग्याची पाहणी करण्याचा मनपा आयुक्तांचा निर्णय

शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी काळेने सात हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने सापळा रचत तलाठी कोळी आणि कोतवाल किशोर चव्हाण (३७, श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) यांना गुरुवारी पाच हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.