लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : म्हसरूळ येथील वन्यजीव अपंगालयात महिनाभराच्या उपचारानंतर क्षत्रबालक या पक्ष्यास छत्रपती संभाजीनगर येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
six year old daughter of labour Swallowed one rupee coin family seek help for treatment
अल्पवयीन मुलीने नाणे गिळले; गरीब कुटूंबापुढे उपचाराचा खर्च पेलण्याचे आव्हान

जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर वनविभागातील दौलताबाद येथे क्षत्रबालक हा पक्षी जखमी अवस्थेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसला. त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन छत्रपती संभाजीनगर वनविभागाने नाशिक येथील पश्चिम वनविभागातील वन्यजीव अपंगालय येथे त्यास उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी क्षत्रबालक याच्यावर हेमराज सुखलाल यांनी उपचार सुरु केले. त्याला रक्ताची आणि लोहाची कमतरता असल्याचे आढळले. पक्षी अशक्त असल्याने त्याला उडता न आल्याने तो जखमी झाल्याचे निदान काढण्यात आले.

आणखी वाचा-मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…

कोठेतरी धडकल्याने पंखांमधील हवेची पिशवी फुटल्याने त्याला उडता येत नव्हते. त्याच्यावर औषधोपचार केल्यानंतर महिनाभरानंतर त्याची उडण्याची चाचणी करुन छत्रपती संभाजीनगर परिसरातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्या ठिकाणी मादी त्याची वाट पाहत होती. दोघे एकत्र हवेत उडाल्याने वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Story img Loader