लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतात १० वर्षांपूर्वी हरवलेली सोन्याची अंगठी मजुरांना कांदे लागवड करताना सापडली. अंगठीचा कोणताही लोभ न धरता मजूर महिलांनी अंगठी शेतमालकास परत केली.

Nagpur, Prayagraj , Sangam water, Ramtek,
नागपूर : प्रयागराजचे हजारो लिटर संगम जल रामटेकमध्ये !
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Those who cannot go to Prayagraj will get experience of holy Kumbh Mela in Nagpur
प्रयागराजला जाणे शक्य नाही; ‘येथे’ मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती…
Three young man arrested for defrauding finance company by passing off fake gold as real
अकोला : नकली सोने गहाण ठेऊन उचलायचे कर्ज; ‌तीन तरुणांची टोळी…
Ancient tunnel discovered while building a house
ऐतिहासिक ठेवा! घराचे बांधकाम करताना आढळले प्राचीन भुयार…
4 pistols 23 cartridges seized from absconding accused solhapur crime
सोलापूर: फरारी आरोपीकडून ४ पिस्तूल, २३ काडतुसे जप्त
MLA Rohit Pawar experienced sorghum harvesting farm karjat jamkhed
आमदार रोहित पवार यांनी शेतामध्ये घेतला ज्वारी काढणीचा अनुभव
Amrit Gatha of Chartered Officer Abhijit Raut
नांदेडमध्ये अडीच वर्षे राहिले; अन् बंगल्याचे नाव बदलून गेले!

विविध कार्यकारी संस्थेचे उपाध्यक्ष उमेश जाधव यांची सोन्याची अंगठी १० वर्षांपूर्वी शेताला पाणी देत असताना हरवली. जाधव कुटूंबियांनी त्या अंगठीचा दोन महिने शोध घेतला. परंतु, अंगठी सापडली नाही. नंतर जाधव कुटूंब त्यांच्या नेहमीच्या कामात मग्न राहिले. सध्या जाधव यांच्या शेतात कांदे लागवड सुरू आहे. या कामासाठी असलेल्या मजूर महिलांपैकी पुष्पा पवार यांच्या विळीच्या टोकाला काहीतरी अडकले. सोन्याची अंगठी अडकल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शकुंतला चारोस्कर, जनाबाई माळी, जनाबाई चारोस्कर, ऋतुजा गांगुर्डे, उषा पवार, पूजा चारोस्कर या इतर मजूर महिलांना अंगठी दाखवून ती शेतमालकाच्याच कुटूंबातील असल्याचा अंदाज करून त्यांच्याकडे परत केली. आजच्या बाजारभावानुसार अंगठीची किंमत सुमारे ८० हजार रुपये आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही फुकटचे काही नको, ही वृत्ती कष्टकरी महिलांनी दाखवून अंगठी परत केली.

आणखी वाचा-नाशिक : शेतकऱ्यांच्या मदतीला आता बळीराजा मदतवाहिनी; फसवणुकीच्या ९०० पेक्षा अधिक तक्रारी

१० वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडल्यामुळे जाधव कुटूंबाने आनंद व्यक्त करून मजूर महिलांना बक्षीस देऊ केले. परंतु, त्यांनी ते नाकारले. तरीही उमेश जाधव यांच्या पत्नीने साडी चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. किरकोळ दानधर्म करतानाही मोठी प्रसिध्दी करणारे अनेक जण समाजात आहेत. दुसरीकडे असेही काही जण आहेत, जे प्रसिद्धीची कुठलीही अपेक्षा न ठेवता आयुष्यभर लोकांना मदत करत असतात. थोडाफार पैसा आला की नीतीमत्ता ढासळते, अशी अनेक उदाहरणे समाजात दिसतात. एखाद्याची थोडी प्रगती झाली तर त्याचा हव्यास अधिक वाढतो. अशी मंडळी नीतीमत्ता सोडून गरिबांना फसविण्याचे प्रकार करु लागतात. असे काही लोक आजकाल गावोगावी झाले असताना त्यांना आरसा दाखवण्याचे काम या मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी त्यांच्या कृतीतून केले,अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अडलेल्या नडलेल्याला वेळप्रसंगी थोडीशी मदत गरिबांना फसवून टाळुवरचे लोणी खाऊन प्रगतिशील झालेले भामटे एका बाजूला समाजात असताना सोन्याची अंगठी सापडल्यानंतरही कोणताही हव्यास मनात न आणता मजूर महिलांनी त्यांच्या वागणुकीतून आदर्श ठेवला आहे.

Story img Loader