शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शेतजमिनीची हद्द कायम पोटहिस्सा मोजणीसाठी २० हजारांची लाच घेताना शिंदखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा

Development Plan, Nashik Metropolitan Authority Area,
नाशिक महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी विकास आराखडा; चांदशी, जलालपूरमधील सांडपाण्याचे नियोजन
College Road, Nashik, motorists,
नाशिक : कॉलेज रोडवर टवाळखोरांसह वाहनचालकांवर कारवाई
Consumer Grievance Redressal Commission has succeeded in getting justice for a woman who was cheated by bhondu baba nashik news
नाशिक: भोंदुबाबाविरुध्द फसवणूक झालेल्या महिलेचा लढा; ग्राहक तक्रार निवारण आयोगामुळे यश
meeting discussed solutions for traffic congestion at Vdarka Chowk including removing traffic island
व्दारका चौकातील कोंडीवर पुन्हा मंथन, बेट काढण्यासह इतर उपायांवर चर्चा
mob attacked two youths over seat dispute on the Chennai jodhpur train killing one nine arrested
नंदुरबार रेल्वे स्थानकातील तरुणाच्या हत्त्याप्रकरणी नऊ जणांना अटक
municipal corporation canceled 11 time rent hike in Satpur and Ambad Industrial estates
उद्योजकांवरील वाढीव घरपट्टीचा भार हलका, अवास्तव करवाढ रद्द
Rashtrawadi Ajit Pawar group ministers from Nashik Guardian Minister post contest absent from meeting
नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतून अजित पवार गट बाहेर ?
12th exam Three people arrested for cheating on the first day of the exam anshik news
विभागात पहिल्या दिवशी नकल करताना तीन जण ताब्यात – इयत्ता बारावी परीक्षा
Ashima Mittal suggests in review meeting that villages on the banks of Goda should manage sewage nashik news
गोदाकाठावरील गावांनी सांडपाण्याचे व्यवस्थापन करावे; आशिमा मित्तल यांची आढावा बैठकीत सूचना

जळगावमधील महाबळ रोडवरील संभाजीनगरातील तक्रारदारांनी शिंदखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांकडे करार करून काम घेतलेल्या बेटावद येथील शेतजमिनीची हद्द कायम पोटहिस्सा मोजणीसाठी अतितातडीचे चलन भरून शेतमोजणीसंदर्भात अर्ज दिला होता. संबंधित काम करून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचा छाननी लिपिक सुशांत अहिरे (३६) याने तक्रारदारांकडून ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ४० हजारांची मागणी करीत त्याच दिवशी २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर उर्वरित २० हजार रुपये काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी आणि सहा जानेवारी २०२३ रोजी पडताळणीदरम्यान उर्वरित २० हजार रुपये आणण्यास सांगितले. यासंदर्भातील तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी तक्रारीची पडताळणी करीत पथक नियुक्त केले. पथकाने धुळे येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचत छाननी लिपिक अहिरे यास २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस, नव्या राजकारणाची नांदी आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटतं…”

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे.

Story img Loader