धोका टाळण्यात यश

नाशिक : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील तलाव २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठय़ा प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिकांना आढळून आल्याने तलाव फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना मिळताच त्यांनी याबाबत प्रशासनाला कळवत घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.

Increasing the height of Almatti Dam poses a flood risk to western Maharashtra
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Kalammawadi dam, Satej Patil, leakage of Kalammawadi dam, Kalammawadi dam news,
काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करावी, सतेज पाटील यांची मागणी
A brutal attack by a crocodile on a buffalo
‘शेवटी जे घडायचं ते घडलंच…’ पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा क्रूर हल्ला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
sandeep kshirsagar
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
Mango , Amaravati Mango, Vidarbha Mango,
यंदा आमरस जोरात, दरही कमी होणार; कडाक्याच्या थंडीमुळे आंबेमोहोर…
Tadoba tiger, tiger bike video Tadoba ,
VIDEO : थरारक… वाघ दुचाकीसमोर आला अन् मग…

तळवाडे भामेर येथील ४५ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला तलाव १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरला. बांधाखालून गढूळ पाणी मोठय़ा प्रमाणात वाहू लागल्याने तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार बोरसे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ आदींना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यंत्राद्वारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला. तलावातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यानच्या काळात तलाव फुटल्याची समाजमाध्यमात अफवा पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यंत्र उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील कामदेखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे बोरसे यांनी सांगितले. पाणी गळती होऊ नये म्हणून तलावाची देखभाल, दुरुस्ती गरजेची होती. या भागात पाऊस कमी असल्याने जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झाले होते.

तलावास धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अभिमन पगार यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader