पंचवटी विभागातील दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागली आहे. तिच्या दुरुस्तीचे काम गुरूवारी हाती घेतले जाणार असल्याने या दोन्ही जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. प्रभाग एक आणि सहामधील काही भागात गुरुवारी दुपारी आणि सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. शुक्रवारी सकाळी प्रभाग एक, चार आणि सहामधील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही.

धुळे: मालमोटार चालकाला मारहाण करुन लूट

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ गळती लागली आहे. या वाहिनीची गुरुवारी दुरुस्ती केली जाणार असल्याने दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. याचा परिणाम त्या जलकुंभावरून ज्या भागात पाणी पुरवठा होतो, त्या भागावर होणार आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार गुरूवारी प्रभाग एकमधील शिवतेज नगर, श्रीधर कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक सहामधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिगेशन कॉलनी, मानकरनगर, महालक्ष्मीनगर, स्वामी विवेकानंदनगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोदाम, यशोदानगर, पेठरोड या परिसरात दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा >>>जळगावातील रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी; मुंबईतील बैठकीत निर्णय

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणी पुरवठा काही भागात बंद राहणार आहे. यात प्रभाग क्रमांक एकमधील दुर्गानगर, शिव समर्थनगर, जुईनगर, ओंकार बंगला परिसर, शिवतेज नगर, श्रीधर कॉलनी, प्रभाग क्रमांक चारमधील कॅन्सर हॉस्पिटलमागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर, तुळजाभवानी नगर, हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्रभाग क्रमांक सहामधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोडचा पश्चिम भाग, मातोश्रीनगर, विद्यानगर, वडजाई मोतानगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिगेशन कॉलनी, मानकर नगर, जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसायटी या परिसरात शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. परिसरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

Story img Loader