नाशिक: येथील ज्योती स्टोअर्सच्या वतीने आणि शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग यांच्या सहकार्याने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत शंकराचार्य संकुल येथे दोन सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्यक्रम मानला जातो. दोन सप्टेंबर रोजी पहिल्या दिवशी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांची मुलाखत गौरी कुलकर्णी या घेणार आहेत. चार सप्टेंबरला ज्येष्ठ कवी, गीतकार संदीप खरे यांचा संवाद रसिकांशी हा कार्यक्रम होणार आहे. नऊ सप्टेंबरला श्रीराम पवार यांचे नरेंद्र मोदी-२.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा या विषयावर व्याख्यान होईल. १० रोजी व्यवस्थापन तज्ज्ञ माधव जोशी यांची माझी कॉपोर्रेट दिंडी या विषयावर सोमनाथ राठी मुलाखत घेतील. १६ रोजी ज्येष्ठ उद्योजक तथा अर्थतज्ज्ञ प्रफुल्ल वानखेडे यांचे गोष्ट पैशापाण्याची, १७ रोजी ज्येष्ठ लेखक रवी वाळेकर यांचे इजिप्त गूढ व अद्भूत देशाची सफर, ३० रोजी प्रा. डॉ. सिध्दार्थ वाकणकर यांचे प्राचीन भारतातील क्रीडा या विषयांवर व्याख्यान होईल.

हेही वाचा >>>बहुचर्चित १५ खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

सहा ऑक्टोबर रोजी नरसय्या आडम यांचे संघर्षाची मशाल हाती, या विषयावर व्याख्यान होईल. आठ ऑक्टोबरला भारतीयांमध्ये मधुमेहाचा उद्रेक- एक कारण मीमांसा या विषयावर डॉ. चिरंतन याज्ञिक यांची डॉ. स्मिता धाडगे मुलाखत घेणार आहेत. १३ रोजी आंतरराष्ट्रीय चित्रकार सुहास बहुळकर यांचे नियतीचा विलक्षण खेळ-नगरकर, चिमुलकर, आलमेलकर – पुस्तकाचे प्रकाशन व सचित्र व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचा समारोप लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे मला घडविणारी माणसे या विषयावरील व्याख्यानाने होईल. कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lekhaka tumchya bhetila program in nashik starting from saturday amy