नाशिक – देवळाली कॅम्पजवळील नानेगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी बिबट्या जेरबंद झाला. नानेगावातील भवानी नगरमधील मनोहर शिंदे यांच्या शेतात बिबट्या आठवडाभर मुक्तपणे फिरत होता. बिबट्या वारंवार दिसत असल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती. सर्वांनाच जीव मुठीत घेवून काम करावे लागत होते.

हेही वाचा – नाशिकमध्ये मायटेक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या तयारीला वेग, महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार, तीनशेपेक्षा अधिक दालनांची व्यवस्था

हेही वाचा – नाशिक : ओबीसी हक्कांसाठी आता समता परिषद मैदानात, उत्तर महाराष्ट्रात मेळावे घेण्याची घोषणा

वन विभागाला या विषयी माहिती दिली असता अधिकारी अनिल अहिरराव आणि सहकाऱ्यांनी शिंदे यांच्या पडीक जागेवर पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला. मंगळवारी पहाटे पिंजऱ्याच्या दिशेने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागला. शिंदे यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आठ ते नऊ वर्षांचा नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून त्याला सुरक्षितरित्या गंगापूर येथील रोप वाटिकेत उपचारासाठी नेण्यात आले आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.

Story img Loader