नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भरवस्तीत मंगळवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच धावपळ उडाली. शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर मानल्या जाणाऱ्या डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेन्सीमागे असणाऱ्या आदित्या हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्याचे आढळून आल्याने रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
एका सफाई कर्मचाऱ्याला बिबट्या दिसल्यानंतर रुग्णालयातील मागच्या भागात त्याला अडकवून ठेवण्यात प्रशासनाला यश आले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्परता दाखवत रुग्णालयातील बाकीची प्रवेशद्वारे बंद करुन बिबट्याला एकाच खोलीत रोखले. या घटनेबाबत पोलीस आणि वनविभाग यांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होवून त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुमारे तीन तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कुठलेही बेशुद्धीचे इंजेक्शन न देता पिंजऱ्यात अडकविण्यात यश आले.
First published on: 12-12-2023 at 13:26 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard entered in shahada hospital of nandurbar district captured after three hours asj