धुळे: शहरातील नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून संचार करणारा बिबट्या अखेर भक्ष्याच्या शोधात आसाराम बापू आश्रमातील गोठ्याकडे आला आणि पिंजऱ्यात बंद झाला. यामुळे परिसरातील रहिवाशांनी निःश्वास सोडला. धुळे शहरालगत असलेल्या नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. समाज माध्यमातून परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या चित्रफितीही फिरु लागल्या होत्या. परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमी झाली. एका वासरावरही बिबट्याने हल्ला केल्याने रहिवाशांमध्ये भीती वाढली होती. ज्या ठिकाणी बिबट्या दिसत असे, त्या ठिकाणी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे लावल्यावरही बिबट्या नंतर त्या ठिकाणी न दिसल्याने वन विभागाकडून परिसरातील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. बिबट्या सतत जागा बदलत असल्याने वन अधिकाऱ्यांनाही त्याचा ठावठिकाणा समजत नव्हता.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
Dombivli West, illegal building, land mafias, demolition notice, municipality, Prakash Gothe, Shankar Thakur, encroachment control,
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
anganwadi workers 500 crores marathi news
अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या, मेगाफोन खरेदीचा घाट
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
Looters arrested in Taljai hill area Pune news
तळजाई टेकडी परिसरात लूटमार करणारे गजाआड

ज्या ठिकाणी एका वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी वन अधिकारी भूषण वाघ यांनी गुरांच्या गोठ्याच्या बाजूलाच आसाराम बापू आश्रमात ट्रॅप कॅमेरा आणि भक्ष्यासह पिंजराही लावला. ज्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच जागेवर तेच वासरू भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. रात्री बिबट्या त्या ठिकाणी आला. त्याने पिंजऱ्यात शिरकाव केला आणि तो बंद झाला. गुरुवारी सकाळी वन अधिकाऱ्यांच्या पथकाने बंद झालेला बिबट्या सुरक्षितस्थळी हलविला. मुख्य वन संरक्षक निनू सोमराज, उप वन संरक्षक नितीन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पूर्ण झाली. १५ दिवस भीतीच्या छायेत काढलेल्या परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.