नाशिक : टाळेबंदीमुळे शहर परिसरातील वर्दळ कमालीची थंडावली असताना या शांततेत वन्यजीवही नागरी वसाहतीकडे आकर्षित होत आहे. बुधवारी रात्री पेठ रस्त्यावरील नामको रुग्णालय परिसरात बिबटय़ा शिरल्याने खळबळ उडाली. रुग्णालयाचे दरवाजे बंद असल्याने अनर्थ टळला. सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागासह पोलिसांना माहिती दिली. पण, तोपर्यंत बिबटय़ा पसार झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रदीर्घ टाळेबंदीमुळे सध्या दिवसाही शहर परिसरातील वर्दळ कमी झालेली आहे. अंधार पडल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणीही रस्त्यावर नसते. त्यावेळी भयाण शांतता अनुभवण्यास मिळते. या वातावरणात वन्यजीवाचा संचार होऊ लागल्याची बाब बुधवारी रात्री समोर आली.

पेठ रस्त्यावर आरटीओ कार्यालयासमोर नामको रूग्णालय आणि परिचारिका महाविद्यालय आहे. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास, भोजनासाठीचे सेवा सदन आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. रात्री सुरक्षिततेच्या कारणास्तव काचेचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आल्यानंतर बिबटय़ाने धूम ठोकली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात बिबटय़ाचा संचार नोंद झाला. बिबटय़ा रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेतील भिंतीवरून उडी मारून आल्याचा अंदाज आहे. रुग्णालयाच्या बाहेर पडण्याचा दरवाजा बंद केला जातो. तिथे सुरक्षारक्षक तैनात असतात. या दरवाजाच्या बाजूने भिंतीवरून बिबटय़ा उडी मारून आत आल्याचे सांगितले जाते.

रुग्णालयापासून काही अंतरावर गंगापूर उजवा तट कालवा आणि शेती, मोकळी जागा आहे. याआधीही मखमलाबादसह शहराच्या परिघात बिबटय़ाचा वावर आढळून आला आहे. त्यापैकी हा एक बिबटय़ा असल्याचा अंदाज वर्तविला जातो. मुख्य प्रवेशद्वारावर मोठी काच लावलेली आहे. तिथपर्यंत येऊन काचेत बिबटय़ा स्वत:चे प्रतिबिंब पाहून माघारी फिरल्याचे चित्रणात दिसते.

रुग्णालय सुरक्षेच्या दृष्टीने दररोज रात्री प्रवेशद्वार बंद केले जातात. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे नामको ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव संस्थेने तातडीने जादा सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच रुग्णालय परिसरात दिव्यांची संख्याही वाढविली जात असून गस्तीच्या पध्दतीतही बदल करण्यात आल्याचे पारख यांनी सांगितले.