युवकावरील हल्ल्यानंतर पिंजरा लावला

नाशिक : पंचवटीतील मखमलाबाद शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्यात बुधवारी युवक जखमी झाल्यानंतर वन विभागाने तातडीने पिंगळे मळा परिसरात पिंजरा लावला. काही महिन्यांपूर्वी मखमलाबाद परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार समोर आला होता. आता बिबटय़ाने थेट हल्ला चढविल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Rose farming in water-scarce areas like Kalas in Indapur taluka
कळसच्या माळरानावर फुलतोय, फुलांचा राजा ‘गुलाब’
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
pune vegetable prices marathi news
पुणे : आले, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटारच्या दरात घट
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Joy of Community Farming
निसर्गलिपी : सामुदायिक शेतीचा आनंद
mumbai Municipality action under hawker-free area campaign
फेरीवालामुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा

शहरातील मखमलाबाद आणि त्यालगतच्या चांदशी शिवारात अधिक्याने शेती आहे. मळे परिसरात बिबटय़ाचे दर्शन घडत असताना बुधवारी सकाळी मखमलाबाद शिवारातील कालवा भागात बिबटय़ाने पवन रमेश तांदळे या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात पवन जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने धाव घेतली. पिंगळे मळा परिसरात बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी मखमलाबादसह शहरातील काही भागांत बिबटय़ाने शिरकाव केल्याची उदाहरणे आहेत. बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे अनेकदा गोंधळ उडाला आहे. स्थानिकांना दहशतीत वावरावे लागले. बिबटय़ाला जेरबंद करताना वन विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. मखमलाबाद आणि लगतच्या चांदशी शिवारात बहुतांश भागात शेती असल्याने तिथे बिबटय़ाला लपण्यासाठी जागा मिळते. लहान मुले बाहेर खेळत असतात, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना मळे परिसरातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. बिबटय़ाच्या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पुन्हा हल्ल्यासारखे प्रकार घडू नये म्हणून वन विभाग दक्षता घेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader