सिन्नर तालुक्यातील चोंढी शिवारात शनिवारी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा – धुळ्यात अहिराणी साहित्य संमेलनाचे जल्लोषात उद्घाटन
हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्याची साडेपाच कोटींची औषध खरेदी रखडली, तांत्रिक मान्यता मिळूनही विलंब
चोंढी शिवार परिसरात दत्तात्रय कडभाने यांच्या शेतात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. याबाबत स्थानिकांनी वनविभागाकडे तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला. शनिवारी सकाळी पिंजऱ्यात असलेल्या कोंबडीचा आवाज ऐकत बिबट्याने पिंजऱ्याकडे धाव घेतल्यावर तो जेरबंद झाला. पिंजऱ्यात अडकल्यानंतर बिबट्याने डरकाळ्या देण्यास सुरुवात केली. बिबट्याच्या आवाजाने कडभाने यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली असता बिबट्या जाळ्यात अडकल्याचे दिसल्याने त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या बिबट्याला पिंजऱ्यातून इतरत्र हलविले. बिबट्या पाच वर्षांचा असून नर आहे.