विद्यार्थ्यांच्या संख्येत ३० टक्क्य़ांनी घट, प्रस्थापित महाविद्यालयांवर तुकडय़ा गमाविण्याचे संकट 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : पुणे, मुंबईसारख्या महानगरांमधील महाविद्यालयात ११ वी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंची झुंबड उडत असताना राज्याच्या उर्वरित भागात मात्र नेमके उलट चित्र दिसत आहे. दोन वर्षांंपासून इयत्ता ११ वी कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी घटल्याने राज्यातील अनेक प्रस्थापित महाविद्यालयांच्या तुकडय़ांवर संकट कोसळले आहे. आता या तुकडय़ा वाचविण्यासाठी संबंधित संस्था आणि शिक्षकांची धडपड सुरू असून ‘विद्यार्थी देता का विद्यार्थी‘असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नवनवीन संधी शोधणे, तसेच प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान यासारख्या मानव्यशास्त्रातील विषयांचे असणारे महत्त्व लक्षात घेता मुंबई, पुण्यामधील महाविद्यालयांमध्ये कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या वाढत आहे. त्यामुळे इयत्ता ११ वीच्या वर्गात प्रवेशासाठीही आता गुणवत्तावान विद्यार्थ्यांमध्ये  सुरू झाली असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे निरीक्षण आहे. याउलट उर्वरित महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच पालकांचा विज्ञान शाखेकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यक यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वाढते आकर्षण हे त्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते.

विद्यार्थ्यांंची नाखुशी हे जसे ११ वीच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांंची प्रवेश संख्या घसरण्याचे एक कारण, तसेच मागील काही वर्षांंत

खिरापत वाटल्याप्रमाणे जागोजागी कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या शासन धोरणामुळेही प्रवेश क्षमता आणि विद्यार्थी संख्या यांचा समतोल बिघडल्याची अणि विद्यार्थ्यांंच्या तुटवडय़ाची ही समस्या निर्माण झाल्याची ओरड केली जात आहे. इंग्लिश माध्यमाच्या आणि माध्यमिक   शाळा चालवणाऱ्या संस्थांना विनाअनुदानित किं वा स्वयंअर्थसा तत्त्वानुसार ११ वी, १२ वीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्याच्या शासन धोरणामुळे कुणीही यावे आणि कनिष्ठ महाविद्यालय घेऊन जावे, असे झाले. यामुळेही जागोजागी कनिष्ठ महाविद्यालयांचे पेव फुटले.

परिणामी मोठी गावे किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रस्थापित असणाऱ्या नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांवर कला शाखेतील विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी अनेक महाविद्यालयांवर तुकडय़ा गमावण्याचे संकट ओढवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शिक्षक अतिरिक्त होण्याची गंभीर समस्या निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कला शाखेतील घटत्या विद्यार्थी संख्येमुळे कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत येण्यामागे शासनाची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. वरिष्ठ महाविद्यालयास जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीसाठी १२० तर माध्यमिक विद्यालयाला जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन तुकडीसाठी ८० विद्यार्थी पटसंख्या शासनाने निश्चित केली आहे. ही बाब वरिष्ठ महाविद्यालयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने वरिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयातील एका तुकडीसाठी ही संख्या अनुक्रमे ८० आणि ६० अशी करावी.

– प्रा. रवींद्र मोरे  (मालेगाव तालुकाध्यक्ष, नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना)