नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातन असल्याने त्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून मर्यादा येत आहेत. यामुळे भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भाविकांना योग्य अशा सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुरातत्व खात्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपसभापती डॉ. गोऱ्हे या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देत मंदिरात पूजा केली. यावेळी, देवस्थानचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, मंदिरातील पुजारी मयूर थेटे यांच्याशी चर्चा करीत त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, भय्या बाहेती, संदीप वाळके, लकी ढोकणे, गिरीश आव्हाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> जळगाव : चांद्रयान-३ साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका; शास्त्रज्ञ संजय देसर्डा यांची द्रवरूप इंधनासाठी कामगिरी

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मंदिरात देशभरातून भाविक येत असल्याने त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पावसाळ्यात भाविक पाय घसरून पडू शकतात. त्यासाठी देवस्थानने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंदिरात होणाऱ्या श्रावणातील विशेष पूजेची माहिती घेतली. मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेत सूचना फलक लावणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले. यासोबतच मंदिराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Limitation of facilities due to archeology department at trimbakeshwar temple opinion of neelam gorhe ysh
Show comments