नाशिक : गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत एक लाख १४ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक-सुरत बसचे चालक विजय बलसार, वाहक अमृतभाई पटेल (रा. सुरत) हे बसच्या माध्यमातून मद्य तस्करी करत होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर सापळा रचला.

हेही वाचा…नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

बस थांबवत तपासणी केली असता चालकाजवळील खोक्यामध्ये मद्यसाठा असल्याचे आढळले. चालक विजयची चौकशी केली असता हा मद्यसाठा पंचवटी येथील एका दुकानात देणार असल्याचे पोलिसांना सांगितले.