नाशिक – राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत कोट्यवधींचा बेकायदा वाहतूक होणारा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिली कारवाई येवल्यातील विंचूर चौफुली भागात करण्यात आली. कोपरगाव – मनमाड मार्गे बेकायदा मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्याआधारे विभागीय उपायुक्त डॉ. बा. ह. तडवी आणि अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने विंचूर चौफुली येथे रात्री नाकाबंदी केली. वाहन तपासणीत एका मालमोटारीत लाकडी भुसा भरलेल्या गोण्यांंखाली गोवा निर्मित आणि राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्याचे तब्बल ९५० खोके मिळून आले. या प्रकरणी सद्दामखान रशिद खान (खडकवाणी, मध्यप्रदेश) या मालमोटार चालकासह संतोष कर (पोर्वोरिम, नॉर्थ गोवा) या सहायकाला (क्लिनर) अटक करण्यात आली. पथकाने वाहनासह तब्बल ८४ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक अ. गो. सराफ, जवान भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर, महेश सातपुते, धनराज पवार आदींच्या पथकाने केली.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
Devendra fadnavis
हिंजवडी आयटीपार्कमधून किती उद्योग बाहेर गेले? देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला
How much money can be carried during elections
महत्त्वाचे! निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात, जाणून घ्या…

हेही वाचा – नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची जळगावमधील ओंकारेश्‍वर मंदिरात पूजा

दुसरी कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात करण्यात आली. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथक क्रमांक एकने हॉटेल अनमोलसमोर वाहन तपासणी केली. यावेळी एका मालवाहू वाहनात दादरा-नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेश निर्मित विदेशी मद्यासह बिअरचे सुमारे ११५ खोके आढळले. या प्रकरणी चालक चेतन पटेल (डुगरा, बलसाड) याला अटक करण्यात आली. या कारवाईत वाहनासह मद्यसाठा असा सुमारे १६ लाख ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विभागीय उपायुक्त डॉ. बा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे. एस. जोखेरे, दुयम निरीक्षक आर. सी. केरीपाळे, वाय. बी. पाटील, जवान सुनील दिघोळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.