नाशिक : बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईतास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

शहरातील ठक्कर बस स्थानकात मुंबई-नंदुरबार बसमध्ये चढत असताना एका महिलेचे मंगळसूत्र चोरीस गेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई नाका, ठक्कर बाजार परिसरात वाढणारी गर्दी पाहता पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही सूचना केल्या.

हेही वाचा…भेसळीच्या संशयावरुन आठ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

u

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने माहिती संकलित केली असता सोनसाखळी चोरीमध्ये सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे आढळले. पोलिसांनी सापळा रचत साहिल पठाण (२३, रा. श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीमुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याकडील तीन आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Story img Loader