नाशिक : नाशिकरोड येथील जबरी चोरीतील ९१,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोनला यश आले आहे. शहर परिसरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली असून त्यानुसार नाशिकरोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक डॉ. समाधान हिरे यांना जबरी चोरी करणारे तीन जण शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत महेश पुजारी (१९, रा. जेतवन नगर), पृथ्वी भालेराव (२०, रा. देवळाली गाव), करण डावर (१९, रा. जेतवन नगर) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, भ्रमणध्वनी, रोख रक्कम असा ९१, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local crime branch division two succeeded in recovering rs 91 400 worth of stolen property from nashik road sud 02