नाशिक : नाशिक लोकसभेची जागा भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाला मिळणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारखे ठरेल. ही गोष्ट भाजपच्या ४०० पार नाऱ्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी, ही समस्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचा दावा भाजपचे माजी महापालिका सभागृह नेते व उमेदवारीसाठी इच्छुक दिनकर पाटील यांनी केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीनही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाले. निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असताना भाजपने पुन्हा एकदा या जागेवर दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in