नाशिक – नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदार संघांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर अशा सहा मतदार संघांसाठी म्हणजे एकाचवेळी एका लोकसभेसाठी ८४ टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे. नाशिकमध्ये ३१ उमेदवार आणि नोटा अशा एकूण ३२ तर, दिंडोरीत १० उमेदवार आणि नोटा अशा ११ जणांची अनुक्रमांकानुसार मोजणी करायची आहे. नाशिकमध्ये दोन कंट्रोल युनिट (सीयू) तर, दिंडोरीत एका सीयू यंत्रावरील ही मोजणी असणार आहे. त्यामुळे दिंडोरीच्या तुलनेत नाशिक लोकसभेच्या निकालास काहिसा अधिक वेळ लागू शकतो.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर १४ दिवसांनी म्हणजे मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सुरुवात होणार आहे. रंगीत तालीमद्वारे यंत्रणेने संपूर्ण तयारी पूर्णत्वास नेली. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिंडोरीपेक्षा नाशिकच्या मतमोजणीला काहिसा अधिक वेळ लागणार असल्याचे नमूद केले. उमेदवारांच्या संख्येमुळे नाशिकमध्ये मतदानासाठी दोन तर, दिंडोरीत एका सीयू (कंट्रोल युनिट) यंत्राचा वापर करावा लागला होता. प्रारंभीच्या एका फेरीसाठी साधारणत: २५ मिनिटांचा कालावधी गृहीत धरण्यात आला आहे. एकदा मोजणीने वेग घेतल्यानंतर नंतरच्या फेऱ्यांसाठी प्रत्येकी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागेल. एखाद्या केंद्रावर कमी-अधिक मतदान झालेले असले तरी यंत्रावरील मोजणीला सारखाच वेळ लागणार आहे.

Budget New Income Tax Act for tax reforms
कर सुधारणांसाठी नवीन प्राप्तिकर कायदा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
nirmala sitharaman Tax
नव्या करप्रणालीमुळे मध्यमवर्गीयांचे पैसे कसे वाचणार?
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर

हेही वाचा >>> Lok Sabha Election Results 2024 : मतमोजणीस्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ५५० असे एकूण ११०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. लष्करी जवान आणि टपाल मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी १० टेबल असतील. सैन्यदलातील मतदारांकडून नाशिकमध्ये ११८६ तर, दिंडोरीत १८६८ तसेच निवडणूक कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांकडून टपाली मतदानाने नाशिकमध्ये ३०७६ आणि दिंडोरीत ३१७३ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. सकाळी प्रथम त्यांच्या मोजणीला सुरुवात होईल. अखेरच्या इव्हीएमच्या मतमोजणीआधी कागदी मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक फेरीनंतर ध्वनिक्षेपकावरून उमेदवारनिहाय मते जाहीर केली जातील. दरम्यान, काँग्रेसने देशभरातील अनेक जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून संपर्क साधला गेल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील प्रश्नावर गृह मंत्रालयाकडून आपल्याशी कुठलाही संपर्क साधला गेला नसल्याचा दावा शर्मा यांनी केला.

हेही वाचा >>> महाराष्ट्रात काही उमेदवार बदलणे राहून गेले, गिरीश महाजन यांची खंत

विधानसभानिहाय फेऱ्या

नाशिक लोकसभेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० तर दिंडोरीत दिंडोरी या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वाधिक २६ फेऱ्या होणार आहेत. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघ २३, नाशिक पूर्व २४, नाशिक मध्य २२, देवळाली २०, इगतपुरी २१ फेऱ्या होतील. दिंडोरी लोकसभेत नांदगाव २४, कळवण २५, चांदवड २२, येवला २३, निफाड २० आणि दिंडोरी २६ फेऱ्या होतील.

… तर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी

अकस्मात मतदान यंत्रात काही दोष उद्भवल्यास, त्यातील मतांची स्पष्टता होऊ शकली नाही तर, हे यंत्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल. सर्व फेऱ्यांची मोजणी संपल्यानंतर ज्या केंद्रावरील हे यंत्र होते, तेथील व्हीव्ही पॅट यंत्रांच्या चिठ्ठ्या मोजल्या जातील, असे निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी सांगितले.

Story img Loader