किरकोळ वादाचे पर्यवसान; सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील भांडणाची कुरापत काढून मद्याच्या नशेत संशयिताने मित्रावरच धारदार शस्त्राने वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमोल बागले (२५, रा. सातपूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

रविवारी रात्री अमोल हा चुलतभाऊ सचिनसोबत दुचाकीने शिवाजी नगरातील आपल्या घरी येत असताना सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. पेट्रोल संपल्याने अमोलने आपला मित्र लोकेश थोरात याला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पेट्रोल घेऊन येण्यास सांगितले. लोकेश हा त्या ठिकाणी उशिराने पोहोचला. त्याच्या सोबत त्याचे मित्र सुनील खरात, किरण बिन्नर होते. अमोलने लोकेशला उशिरा आल्याबद्दल जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.

लोकेश आणि त्याचे मित्र मद्याच्या नशेत होते. या वादात काही दिवसांपूर्वी मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमास का नेले नाही? यावरूनही लोकेश आणि अमोल यांच्यात वाद सुरू झाला. या वादात अमोलने लोकेशच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने लोकेशने मित्र सुनील आणि किरण यांच्या मदतीने अमोलवर धारदार शस्त्राने वार केले. हा वाद सुरू असताना सचिनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही कळण्याच्या आत संशयित फरार झाले. जखमी अमोलला रविवारी रात्री उशिराने सातपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे.

पोलीसही चक्रावले

अमोल बागले हा युवक आपल्या मित्रांसोबत सातत्याने भाईगिरी करत असे. कोणाचीही मजा घे, कधी कोणाशीही वाद घालायचा असा त्याचा स्वभाव होता. संशयित लोकेशसोबत याआधी त्याचे असे क्षुल्लक कारणावरून काही वेळा वाद झाले होते. रविवारी रात्री ‘पेट्रोल आणायला उशीर का झाला? अशी विचारणा करत अमोलने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून हा वाद वाढत गेला. अमोलला अद्दल शिकवायची म्हणून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. पोलिसांनी तपासात संशयितांना धारदार शस्त्र का बाळगता? अशी विचारणा केली असता मित्रांना धाक दाखवण्यासाठी आम्हाला चाकू लागतो, असे बेफिकीर उत्तर मिळाल्यावर पोलीसही चक्रावले.