‘लोकसत्ता लोकांकिका’ची आज विभागीय अंतिम फेरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘मुंबई आमचीच..’ असा दावा करीत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत कामगिरीचा स्तर उंचाविण्यासाठी चारही महाविद्यालयांच्या संघांनी जोरदार तयारी केली आहे. प्राथमिक फेरीत परीक्षकांनी केलेल्या सूचना, सादरीकरणात झालेल्या काही चुका, वेळेचे चुकलेले गणित यावर मात करून राज्यस्तरीय महाअंतिम फेरीतील प्रवेशासाठी चारही एकांकिकेत जोरदार चुरस आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात मंगळवारी सायंकाळी साडेचारपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ची विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.
के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे तेजस बिल्दीकर म्हणाले, विभागीय अंतिम फेरीत निवड झाल्यामुळे संपूर्ण चमू उत्साही आहे. प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाल्यापासून अंतिम फेरीवर आपली मोहर उमटविण्यासाठी दररोज सलग आठ ते नऊ तास वेळा तालमी केल्या जात आहेत. परीक्षकांच्या सूचना लक्षात घेत नाटकाचे कथानक फुलविण्यासाठी काही प्रसंगांवर विशेष बारकाईने काम केले आहे. वेळेवर होणारा गोंधळ टाळण्यासाठी नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांच्यावर मेहनत घेत कलावंताचा अभिनय सहज सुंदर कसा होईल यासाठी प्रयत्न केला आहे.
विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाल्याचे कळताच सगळीकडून शुभेच्छांचा वर्षांव झाला. कलावंताच्या पाठीवर पडलेल्या शाबासकीच्या थापेमुळे कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी दिवसभर तयारी सुरू आहे. काही कलाकारांच्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असून त्यांचा अभ्यास, पेपर यांचे नियोजन सांभाळत तालमी होत आहेत. परीक्षकांच्या सूचनांनुसार एकांकिकेच्या शेवटच्या भागात काही बदल केले आहेत. ग्रामीण बाज असल्याने कलाकार भाषेवर मेहनत घेत आहेत. तसेच तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी प्रकाशयोजनेवर लक्ष देण्यात येत आहे. नाटकात प्रत्यक्ष संगीतासोबतच ध्वनिमुद्रित संगीताची नवीन भर घातली असल्याचे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण जाधव यांनी सांगितले.
सादरीकरणात आम्ही कुठे चुकलो किंवा लेखकाला नेमकं काय सूचित करायचे आहे, या संदर्भात परीक्षकांनी सूचना केल्या. त्यानुसार पडद्यावर तसेच पडद्यामागेही तांत्रिक बाबींवर काम सुरू असल्याची माहिती हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्या आर्या शिंगणे हिने दिली. संवादफेक, आवाजाचे चढ-उतार यावर जास्त काम केले आहे. काही प्रसंग नव्याने बसविले असून संहिता वेगवान करण्यावर भर दिला आहे. तांत्रिक बाजू भक्कम असावी यावर लक्ष दिले असून सर्व सहकाऱ्यांची उत्तम भट्टी जमल्यामुळे एकांकिका अधिकच परिणामकारक झाली असल्याचे आर्याने सांगितले. एकांकिकेवर शेवटचा हात फिरवला जात असल्याचे भि. य. क्ष. महाविद्यालयाचा प्रतीक विसपुते म्हणाला.
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टुर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर म्हणून तर एबीपी माझा न्यूज पार्टनर आहेत.