जळगाव : निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम यंत्रावरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे.
रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील म्हणाले यांनी, मतदान यंत्रे एवढ्या दिवसांपासून ठेवूनही त्यांची बॅटरी ९९ टक्के कशी आहे, अशी शंका उपस्थित करीत रावेर लोकसभा मतमोजणीवर आक्षेप घेतला. ज्या मतदान यंत्राची बॅटरी ९९ टक्के आहे, त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असून, दिवसभर यंत्रात मतदान झाले. एवढे असूनही मतदान यंत्रातील फक्त एक टक्का चार्ज कसे कमी होऊ शकते? असे प्रश्नही पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह पदाधिकार्यांकडून उपस्थित केले. त्यानंतर काही वेळ मतमोजणी थांबवण्यात आली. दरम्यान, आता पुन्हा मतमोजणी सुरू झाली असून, सहाव्या फेरीअखेर रक्षा खडसे यांना जवळपास ७५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. मतदारसंघात तिसर्या फेरीची मतमोजणी सुरू असून, भाजपच्या रक्षा खडसे यांचे मताधिक्क्य वाढत आहे. अजून २३ फेर्यांपर्यंत पोहोचायचे आहे. कदाचित हे मताधिक्क्याची आघाडी अडीच लाखांपर्यंत जाऊ शकेल आणि हे चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. विरोधकांचे संतुलन बिघडलेले दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका त्यानुसार यांनी गोंधळ घालायचं केलेलं ठरवत दिसतंय असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.